श्री गोविंद प्रभु अवतार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

" श्री गोविंदप्रभू जन्मोत्सव " :- गोविंदप्रभू चा जन्म काटसरे ( रिद्धपूर पासुन ८ मैलावर ) येथे शके ११०९ भाद्रपद शुद्ध ञयोदशी दिनांक २२ ऑगष्ट ११८७ रोजी राञी १० वाजता झाला . पित्याची नांव अनंतनायक माता नेमाइसा . आईवडिल लहानपणीच वारल्यामुळे गोविंदप्रभूं चे पालनपोषण रिद्धपूर येथिल मामा-मावशीने केले. वयाच्या सातव्या वर्षी मुंजीबंधन होऊन गोविंदप्रभू शिक्षणासाठी रिधपुरास आले ते शेवट पर्यंत तेथेच राहिले . त्यांनी श्री चक्रपाणी कडुन  शिष्यत्व पत्करले  . श्री गोविंदप्रभूंचा अवतार हा " आच्छादनीचा परदृश्यावतार होता. वस्तुत: पर आणी अवर अशा दोन्ही विद्ध्या जाणणारा , म्हणजेच ' उभयदृश्या ' असुनही ज्याने आपल्या ठिकाणची अवरविद्ध्या आच्छादुन केवळ परविद्द्या प्रगट केली त्याला आच्छादनीचा पर दृष्यावतार म्हणतात. गोविंदप्रभूंचा अवतार या प्रकारचा असुन शिवाय तो दवडण्याचा अवतार होता . म्हणजे त्यांनी जन्म घेतांना आपल्या मातेच्या गर्भातुन दुस-या एका जीवाला दवडून त्याच्या जागी आपण अवतार घेतला. त्याचे देहधर्म श्री प्रभुंना स्विकारावे लागले. श्री प्रभू प्रत्यक्ष परब्रम्ह अवतार होते त्यामुळे ते कोणत्या ही जीवाचा तात्काळ उद्धार करित होते. त्यांनी सर्व जातीभेदाच्या भिंती झुगारुन देऊन सर्वसमा वेशक वर्तन केले . स्ञी-पुरुष सर्वांना भक्तीचा अधीकार दिला. आर्तवंतांच्या मदतीस धावुन गेले म्हणुन त्यांना " राऊळ माय - राऊळ बापु" असे म्हणत . अशा ह्या परब्रम्ह अवतारास दंडवत प्रणाम .

Popular posts from this blog

फलटणवासीयांकडून पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांचा भव्य जाहीर नागरी सत्कार संपन्न

#श्री_संत_शिरोमणी_नरहरी_ सोनार महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !