फलटणवासीयांकडून पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांचा भव्य जाहीर नागरी सत्कार संपन्न

*फलटणवासीयांकडून पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांचा भव्य जाहीर नागरी सत्कार संपन्न*

महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या हस्ते आज फलटण येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी फलटणवासीयांकडून मा. ना. शंभूराज देसाई साहेबांचा भव्य जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी उपस्थितांशी सुसंवाद साधला.  

फलटणवासीयांनी दाखवलेल्या या प्रेमामुळे काम करण्यासाठी आणखी ऊर्जा मिळाल्याची भावना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी व्यक्त केली. तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घटनानिमित्ताने फलटण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी सरकार निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी खासदार मा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सातारा जिल्हाप्रमुख मा. चंद्रकांतदादा जाधव, मा. जयवंतराव शेलार, मा. पुरुषोत्तम जाधव, फलटण नगर परिषदेतील गटनेते मा. अशोकराव जाधव, तसेच मा. सचिन अहिवळे, मा. शारदाताई जाधव, मा. रणजितसिंह भोसले, मा. वासुदेवकाका माने, मा. विराजभैय्या खराडे, मा. विजयराव मायने, मा. सचिन बिडवे आणि सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते-शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

श्री गोविंद प्रभु अवतार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

#श्री_संत_शिरोमणी_नरहरी_ सोनार महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !