सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामींचा आज 801 वा अवतारदिन. स्त्री शूद्रांना धर्माचा अधिकार दिला, मातंगांना ब्राह्मणांच्या पंगतीत सहभोजन केले. चातुर्वर्ण्य व्यवस्था नाकारून आपल्या ब्राह्मण शिष्यांनाही चातुर्वर्यं चरेत् भैक्ष्यम असा आदेश देऊन चारही वर्णाच्या घरी भीक्षा मागण्याची आज्ञा केली. व्रत वैकल्य कर्मकांड पशू हिंसा अंधश्रद्धा शोषण करणारी क्षुद्र तामसिक भक्ती नाकारून श्री गीता प्रणित अनन्य ईश्वरभक्तीचा उपदेश केला. स्त्रीयांना पुरूषाचे बरोबरीने अधिकार देऊन महदंबा सारख्या अनेक स्त्रिया घडविल्या. मुंगीची देखील हिंसा आपले हातून घडू नये. असा अत्यंतिक अहिंसेचा आग्रह धरला. महाराष्ट्री असावे. महंत राष्ट्र म्हणौनी महाराष्ट्र .असा महाराष्ट्र चा गौरव केला. मराठी भाषेत निरोपण करून. मराठी साहित्याचा पाया रचला. मराठी भाषेत लीळाचरित्रासारखा अनमोल असा आद्यग्रंथ निर्माण करणारे माहिंभट्टासारखे विद्वान घडवून तयार केले. महाराष्ट्रात मराठी भाषेत वांगमय निर्माण करणारा महानुभाव हा भक्ती सांप्रदाय स्थापन केला. 
त्यांची आज 801 वा अवतार दिनी  सत्य अहिंसा मानवता बंधूभाव ईश्वर भक्तीचा पुरस्कर्त्या भगवान श्री चक्रधरस्वामींना विनम्र अभिवादन.

Popular posts from this blog

फलटणवासीयांकडून पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांचा भव्य जाहीर नागरी सत्कार संपन्न

श्री गोविंद प्रभु अवतार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

#श्री_संत_शिरोमणी_नरहरी_ सोनार महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !